हनुमानाला शेंदूर का लावतात

हिंदू धर्मातील शेंदुराचे महत्व कोणास माहित नाही. एका विवाहीतेसाठी शेंदूर हे फक्त तिच्या मांगल्याचेच प्रतिक नाही, तर तो एक प्रकारचा दागिणा आहे. देवपूजेत सुद्धा शेंदुराचे एक विशेष महत्व आहे. साधारणतः सर्व देवी देवतांना शेंदुराचा टीळा लावला जातो, मात्र हनुमानाला शेंदूराचे वस्त्र चढवले जातात. यामागे एक शास्त्र आहे ज्याचे वर्णन रामचरितमानस मध्ये आहे.

असे म्हटले जाते, कि जेव्हा श्री राम, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले तेव्हा एके दिवशी श्री हनुमानाने सीता मातेस आपल्या कपाळावर शेंदूर लावताना पहिले. एका वानरासाठी हि एक विचित्र गोष्ट होती तेव्हा श्री हनुमानाने सीतेस त्याबद्दल विचारले. सीता मातेने सांगीतले, कि शेंदूर लावल्याने त्यांना श्री रामाचे प्रेम प्राप्त होईल आणि अशा प्रकारे ते एक मांगल्याचे प्रतिक आहे.

श्री हनुमान तर रामाचे भक्त असून अत्यंत भोळ्या स्वभावाचे, तेव्हा जर ते फक्त कपाळावरच नाही तर संपूर्ण शरीरावर शेंदूर लावतील तर श्री रामाचे त्यांना भरपूर प्रेम मिळेल आणि त्यांना दीर्घायुष्य लाभेल या विचाराने त्यांनी आपले संपूर्ण शरीर शेंदुराने रंगवले आणि त्याच अवस्थेत श्री हनुमान सभेमध्ये गेले.

श्री रामाने श्री हनुमानाला जेव्हा शेंदुराने रंगलेले बघितले, तेव्हा त्यांनी त्याचे कारण श्री हनुमानास विचारले. श्री हनुमानाने सुद्धा मोकळेपणाने सांगीतले, कि त्याने हे फक्त श्री रामाचे प्रेम मिळविण्यासाठी केले आहे. हे ऐकुन श्री राम इतके प्रसन्न झाले कि त्यांनी हनुमानाला मिठीत घेतले. तेव्हापासून हनुमानास प्रसन्न करण्याकरिता त्याच्या मूर्तीला शेंदुराने रंगविले जाते. त्यामुळे श्री हनुमानाचे तेज अधिक प्रखर होते आणि भक्तांमध्ये आस्था वाढीस लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *