काय आणि नारदांनी श्री विष्णूला श्राप देण्यामागचे रहस्य ?

एके दिवशी नारद मुनी एका गुफेमध्ये तपश्चर्या करीत होते. त्यांची तपश्चर्या पाहून देवराज इंद्र चिंतीत झाले आणि त्यांनी नारादांची तपश्चर्या भंग करण्याचे ठरवले. इंद्रदेवाने अग्निदेव, वायुदेव आणि काही देवतांना नारदमुनींची तपश्च्यर्या भंग करण्यास पाठवले, परंतु ते सर्व त्यांची तपश्चर्या भंग करण्यात अयाशस्वी ठरले.

शेवटी इंद्रदेवाने हे कार्य कामदेवाला सोपवले. खूप प्रयत्न केल्यानंतर कामदेव सुद्धा नारदमुनींची तपश्चर्या भंग करू शकला नाही आणि त्याने हार मानली आणि तो म्हणाला, कि श्री महादेव सुद्धा आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवू शकले नाही आणि त्यांनी मला भस्म केले होते परंतु, तुम्ही कामासह आपल्या क्रोधावर सुद्धा नियंत्रण मिळवले आहे.

कामदेवाचे म्हणणे ऐकुन नारद मुनी खूप प्रसन्न झाले आणि ते स्वतःस ईश्वरापेक्षा श्रेष्ठ समजून त्यांच्यात अहंकार निर्माण झाला. त्यांनी श्री महादेव आणि श्री विष्णूस हि गोष्ट सांगितली. श्री विष्णूंना समजले, कि नारद मुनींना अहंकार आला आणि जे योग्य नाही, म्हणून त्यांनी नारद मुनींना धडा शिकवण्याचे ठरवले.
आता श्री विष्णूने आपली माया रचण्यास सुरुवात केली.

त्यांनी एका नगराची निर्मिती केली ज्याचा राजा होता शिलनिधी आणि त्याची एक सुंदर कन्या होती जिचे नाव होते विश्वमोहिनी. एके दिवशी नारद मुनी तेथून जात होते तेव्हा त्याचे लक्ष त्या नगरावर गेले आणि ते राजाला भेटण्यास गेले. तेव्हा राजाने नारदमुनींची भेट आपल्या मुलीशी करून दिली. विश्वमोहीणीस पाहून नारद मुनी मोहित झाले आणि म्हणाले, कि जो पण या मुलीशी विवाह करेल तो ईश्वरासामान होईल आणि त्यास युद्धभूमीवर कोणीही हरवू शकणार नाही. हे ऐकुन राजा शिलनिधिने स्वयंवराची घोषणा केली.

आता नारद मुनी श्री विष्णू जवळ गेले आणि त्यांना सल्ला मागितला, कि काय केले तर राजकन्या स्वयंवरात त्यांनाच पसंत करेल. आता श्री विष्णूने एक योजना आखली त्यांनी स्वयंवरात नारद मुनींच्या चेहऱ्याच्या जागी एका माकडाचा चेहरा लावला. जेव्हा राजकन्येने नारद मुनींना पहिले तेव्हा ती अचंबित झाली आणि तिने वरमाला त्यांच्या शेजारी बसलेल्या राजकुमाराच्या गळ्यात घातली. नारद मुनींना हे माहित नव्हते, कि त्यांच्या चेहऱ्याच्या जागी एका माकडाचा चेहरा आहे परंतु, जेव्हा त्यांनी पाण्यामध्ये आपला चेहरा पहिला तेव्हा त्यांना समजले, हा सर्व चाल श्री विष्णुंची आहे.

तेव्हा नारद मुनींनी श्री विष्णूला श्राप दिला, कि ज्या प्रकारे तुम्ही माझा वियोग करून मला दुखी केले आहे त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा स्त्री च्या वियोगामध्ये दुखी व्हाल आणि तेव्हा एक माकडच तुम्हाला सहकार्य करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *