काय आहे हनुमानाच्या ‘पंचमुखी’ या नावामागील कथा?

राम आणि रावणाच्या सैन्यामध्ये भयानक युद्ध सुरु असताना रावणाला आपला पराभव जवळ असल्याचे लक्षात आले तेव्हा पराभवापासून वाचण्यासाठी रावणाला त्याचा मायावी भाऊ अहिरावण याची आठवण आली जो भवानी मातेचा परम भक्त होता. तसेच, त्यास तंत्र मंत्र विद्येचे ज्ञान होते. त्याने आपल्या मायावी शक्ती च्या जोरावर संपूर्ण सेनेला निद्राधीन केले. तसेच, राम आणि लक्ष्मणाचे अपहरण करून पाताळात घेऊन गेला होता.

काही वेळाने जेव्हा त्याच्या मायावी शक्तीचा प्रभाव कमी झाला तेव्हा विभीषणाला हे कार्य अहिरावणाचे असल्याचे लक्षात आले आणि त्याने हनुमानाला राम आणि लक्ष्मणाची मदत करण्यासाठी पाताळात जाण्यास सांगीतले. पाताळाच्या दारावर हनुमानास अहिरावाणाचा पुत्र मकरध्वज भेटला आणि त्यास युद्धामध्ये हरवून बंधक असलेल्या श्री राम आणि लक्ष्मणास भेटला.

तेथे हनुमानास पाच दिशांना पाच जागी पाच दिवे लावलेले दिसले. जे दिवे अहिरावाणाने भवानी माते साठी पेटवले होते. या पाच दिव्यांना एकाच वेळी विझावल्यास अहिरावणाचा वाध होणार असल्याने हनुमानाने त्याचा वध करण्याकारीत्ता पंचमुखी रूप धारण केले. उत्तर दिशेस वराह मुख, दक्षिण दिशेस नरसिंह मुख, पश्चिम दिशेला गरुड मुख, आकाशाच्या दिशेला हयग्रीव मुख आणि पूर्व दिशेस हनुमान मुख. हे पंचमुखी रूप धारण करून हनुमानाने एकाच वेळी ते पाचही दिवे विझवले आणि अशाप्रकारे अहिरावाणाचा वध करून राम आणि लक्ष्मण दोघांना त्यापासून मुक्त केले.

याच प्रसंगावरून एक आणखी कथा आपल्याला ज्ञात होते ती अशी कि, जेव्हा मरियल नावाचा दानव श्री विष्णूचे सुदर्शन चक्र चोरले आणि हि बाब हनुमानाला कळली तेव्हा त्याने तो सुदर्शन चक्र पुन्हा प्राप्त करून श्री विष्णूला सोपविण्याचा संकल्प केला. मारियल दानव इच्छेनुसार रूप बदलण्यात निपुण होता. तेव्हा श्री विष्णूने हनुमानास आशीर्वाद दिला.

आशीर्वादासोबातच इच्छेनुसार वायुगमनाच्या शक्तीसह गरुड मुख, भय उत्पन्न करणारे नृसिंह मुख, ज्ञानप्राप्तीसाठी हयग्रीव मुख तसेच, सुख समृद्धीसाठी वराह मुख होते. देवी पार्वतीने हनुमानास कमलपुष्प तसेच, यम-धर्मराजाने पाश नावाचे अस्त्र प्रदान केले. या सर्वांच्या शक्ती आणि आशीर्वादामुळे हनुमान मारियल दान्वावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी झाला. तेव्हा पासून त्याच्या या पंचमुखी रुपास सुद्धा मान्यता मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *