शनी ची चाल मंद का आहे?

शनीला सर्वात मंद गती ने चालणारा ग्रह मानले जाते. त्याच्या मंद गतीमुळेच त्याचे नाव शनैश्चर असे पडले. त्याच्या या नावामध्ये दोन अर्थ आहेत, शनी: चर. शनी: चा अर्थ मंद आणि चर च अर्थ होतो चालणारा, म्हणून शनीला सर्वात जास्त काळ प्रभावित करणारा ग्रह मानले जाते.

शनी ची चाल मंद का आहे:

या मागची पौराणिक कथा अशी आहे कि, ऋषी दधिचीने जगाच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान दिले आणि आपली हाडे इंद्रदेवाला सोपवली, ज्याद्वारे इंद्रदेवाने वज्र निर्माण केले. त्यावेळी ऋषीची पत्नी गरोदर होती. हि गोष्ट तिला कळल्यावर तिने आपले गर्भ कापून पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि स्वतः प्राणत्याग केला.

जन्मलेल्या बाळाचे संगोपन दधिची ऋषीची बहिण दधिमतीने केले आणि त्याचे नाव पिंपळाद ठेवले. त्याचे नाव पिंपळाद ठेवण्यामागचे कारण असे होते कि, त्याचा जन्म पिंपळाच्या झाडाखाली झाला. पिंपळाच्या झाडाखालीच त्याने तपश्चर्या केली आणि पिंपळाची पाने हेच त्याचे भोजन होते. जेव्हा पिंपळाद मोठा झाला तेव्हा त्याला कळले कि त्याचे वडील दधिचीचा मृत्यू त्याच्या जन्माच्या आधीच झाला होता.

त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल देवतांना विचारले असता देवतांनी सांगीतले कि, शनिदेवाची दृष्टी पडल्याचे तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला. हे समजल्यावर पिंपळादाने आपल्या तपस्वी शक्तीद्वारे शनीदेवावर ब्रह्मदंडाने प्रहर केला. त्यापासून वाचण्यासाठी शनिदेव पळू लागला; परंतु ब्रह्मदंडाचा एक प्रहार शनिदेवाच्या पायावर लागला. त्यामुळे त्याच्या पायांमध्ये आधीसारखी शक्ती राहिली नाही.

शनिदेव पळतच श्री महादेवाकडे गेला आणि पिंपळादापासून आपले रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा श्री महादेवाने पिंपळादाला रोखले आणि समजावले कि, यामध्ये शनिदेवाचा काहीही दोष नाही. शनिदेव तर सृष्टीच्या नियमांचे पालन करत आहेत, तुझ्या वडिलांचा काळ आला होता. हे ऐकुन पिंपळादाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने ब्रह्मदंड परत घेतले; परंतु त्या ब्रह्मदंडाचा प्रभाव आजपण शनीदेवाच्या पायांवर आहे.

असे मानले जाते कि, पिंपळादाचे स्मरण करणारयास शनिचा कधीच त्रास होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *