शनी देवाला तेल का अर्पण करतात, जाणून घ्या

why do we offer oil to shani dev

शनिवारच्या दिवशी शनिदेवाला तेल अर्पण केल्याने भक्तांचे दुखः दूर होऊन शनी देव प्रसन्न होतात असा साधारण समज आहे, परंतु हे ऐकुन तुम्हाला आश्चर्य वाटेल, कि शनी देवाला तेल अर्पण केल्याने त्यांचेच दुखः दूर होते.

यामागे एक पुराणातील कथा आहे. हिंदू पुराण कथांनुसार – एके दिवशी श्री हनुमान तपश्चर्या करत होते. तेव्हा तेथे शनी देव आले आणि त्यांनी श्री हनुमानास युद्धाचे आमंत्रण दिले. परंतु, श्री हनुमानाने युद्ध करण्यास नकार दिला आणि म्हटले, कि “कृपा करून आपण माझ्या तपश्चर्येत विघ्न आणू नये आणि येथून निघून जावे.”

परंतु, पुन्हा पुन्हा सांगितल्यावर सुद्धा शनिदेव तेथून गेले नाही आणि श्री हनुमानास म्हणाले, कि “मी असे ऐकले आहे कि तू खूप बलवान आणि शक्तिशाली आहेस, पण मला पाहून तुझी शक्ती कुठे गेली. एकतर माझ्याशी युद्ध कर नाहीतर माझा दास बन.”

हे ऐकुन श्री हनुमान क्रोधित झाले आणि त्यांनी शानिदेवास आपल्या शेपटीत फसवून इकडून तिकडे फिरवून एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर आपटले. त्यामुळे शनीदेवाचे संपूर्ण शरीर जखमी झाले. शरीरावरील जखमांनी त्रस्त होऊन शानिदेवाने श्री हनुमानास आपल्याला सोडून देण्याची विनंती केली आणि वचन दिले, कि आजपासून मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकीन.

शनिदेवाची याचना ऐकुन श्री हनुमानाने त्यांना मुक्त केले आणि वचन घेतले, कि आजपासून तू माझ्या कोणत्याही भक्तास त्रास देणार नाही आणि त्याची रक्षा करशील. तेव्हा पासून शनिदेवाला तेल अर्पण केले जाते, जेणे करून त्यांचा त्रास कमी होऊन तेल अर्पण करणाऱ्या भक्तावर शनिदेवाची कृपा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *