हिंदू पूजेतील नारळाचे महत्व जाणून घ्या

हिंदू धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणारया वस्तूंचे आपले स्वतःचे असे एक विशेष महत्व आहे. तांदूळ, राळ, आंब्याची पाने, नारळ इत्यादींचे प्रतीकात्मक असे महत्व आहे. आपण पहिले असेल नवीन वाहन खरेदी, गृह प्रवेशाच्या वेळी नारळ फोळले जाते. तर बघूया हिंदू धर्मा मध्ये या विधीचे काय महत्व आहे.

विद्वानांचे म्हणणे आहे, कि नारळ फोळणे म्हणजे अहंकारास तोडणे होय. नारळाचे खोळ अहंकाराप्रमाणे कठीण आणि टणक असते. त्यास जोपर्यंत तोडले जात नाही तो पर्यंत ते कोणत्याच गुणास आत शिरू देत नाही आणि बाहेर सुद्धा येऊ देत नाही. हा अहंकार तुटल्यास मनुष्यास शुभ्र पर्वताप्रमाणे दिव्य ज्ञान आणि आतील पाण्याच्या रुपात अमृत प्राप्त होते.

शास्त्रामध्ये एक श्लोक आहे ज्याचा मराठी अनुवाद काही या प्रकारे आहे.

“हे परमेश्वरा ! माझ्या डोक्याच्या केसांना धर,
तुझ्या दोन्ही डोळ्यांनी माझ्या डोळ्यात एक कटाक्ष टाक,
एक तीक्ष्ण वार करून माझे शीर काप,
आणि माझे हे शीर तुझ्या चरणामध्ये स्विकार कर.”

थोडक्यात, नारळ हे आपल्या शिरा समान आहे, ज्याच्या सभोवती नको असून सुद्धा अहंकाराची भावना येतेच.
पूजेच्या वेळी किवा कोणत्याही शुभ कार्यापूर्वी नारळ फोडून या अहंकारास नष्ट करण्याची प्रार्थना आपण परमेश्वरास करत असतो. जेणेकरून आपल्या ज्ञान वृद्धीसाठी श्रुष्टीतील चांगुलपणा पाहू शकू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *